अपचन - कारणे लक्षणे आणि उपाय

अपचन कारणे लक्षणे आणि उपाय
चांगली पचनक्रिया चांगला आरोग्याचं लक्षण आहे पचनशक्ती चांगले ठेवून आपण अनेक रोगापासून दूर राहू शकतो परंतु आजच्या धावपळीच्या जेवण शैलीमुळे अन्नपचनाची समस्या ही नेहमीच भेडसावत असते पोट फुगणे गॅस एसिडिटी अपचन जडपणा ही लक्षणं आपण रोज अनुभवतो याच्याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र दीर्घकालीन त्रास होऊ शकतो आयुर्वेदात या विकारावर अनेक घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत चला तर मग या वरील समस्या आणि उपाय सविस्तर जाणून घेऊया. 

अपचन होण्याची कारणे  : 
1. अनियमित जेवणाची सवय : अनियमित आणि अयोग्य जेवणामुळे पोटात गॅस होणे छातीत दुखणे धडधडणे यावर घरगुती उपाय म्हणजे थोडी सुंठ पावडर व थोडा सेंद्रिय उकळून बनवलेले मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो.
2. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थाचे सेवन : फास्टफोड अति थंड किंवा तळलेले पदार्थ मसालेदार अन्न जंक फूड हे सहज उपलब्ध होतात व आपल्या सोयीचेही वाटतात परंतु याच्या अतिशय लठ्ठपणा हृदयविकार त्याचबरोबर पोटाचे विकारही उद्भवू शकतात. 
3. पाण्याचे अयोग्य सेवन : पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते त्याचबरोबर डीहायड्रेशन पोटदुखी त्वचेच्या समस्या रक्तदाब कमी होणं इत्यादी विकार होऊ शकतात. 
4. सततचा ताणतणाव आणि मानसिक चिंता : सततचं ताणतणाव आणि मानसिक चिंता यामुळे पचनक्रिया बिघडते त्याचबरोबर पोटदुखी अपचन मळमळ छातीत जळजळ ही होऊ शकते. 
5. व्यायामाचा अभाव आणि आळशी जीवनशैली: वेळ काढून दररोज थोडे व्यायाम योगासन करणे अत्यंत गरजेचे आहे  व्यायामाच्या अभावा मुळे पोटाची चरबी वाढणं आतड्यांची हालचाल मंदावणे ह्या गोष्टी होत असतात व त्यामुळे बद्धकोष्ठता अपचन पोटदुखी पोटावरची चरबी वाढणं इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

अपचनाची लक्षणे : पोटात गॅस होणे वारंवार ढेकरांना छातीत जळजळ होणं छातीत दुखणं शौचास त्रास होणे अजीर्ण होणं भूक न लागणं इत्यादी अपचनाची लक्षणे आहेत. 

आयुर्वेदिक घरगुती उपाय :

चला तर मित्रांनो जाणून घेऊया अपचना वरील

आयुर्वेदिक उपाय 

1. त्रिफळा चूर्ण -: 
                       रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी कोमट     पाण्याबरोबर   एक चमचा त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा ज्यूस घेतल्यास शौचास साफ होऊन दिवसभर शरीर हलकं राहतं 

2. मध आणि आल्याचा रस -:                                        सकाळी उपाशीपोटी एक चमचा मध आणि अर्धा  चमचा आल्याचा रस घेतल्याने पोटात होणारा गॅस कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते .

3. लिंबाचा रस आणि हिंग -: 
  जेवणानंतर गरम पाण्यात हिंग आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून घेतल्यास पोटातील गॅस कमी होतो अजीर्णपणा नाहीस होतो व पचनशक्ती वाढते. 

4 पुदिना आणि कोथिंबीर-: 
       पुदिना आणि कोथिंबीर यांचा एक एक चमचा रस घेतल्यास पोटाला थंडावा मिळतो आणि ऍसिडिटी कमी होते. 

5. प्राणायाम -:
पचनक्रिया चांगली राहण्यासाठी दररोज दहा मिनिटं कपालभाती प्राणायाम उपयोगी ठरतं .

आयुर्वेदाचे हे साधे परंतु अत्यंत प्रभावी रामबाण उपाय केल्यास पचनक्रिया सुधारून पोटविकारासंबंधी त्रास नक्कीच दूर होतील 

 टीप -:  हा लेख आयुर्वेदिक उपायाबाबतीत माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेला आहे. लेखातील माहिती आपले आयुर्वेदिक ज्ञान वाढवण्यास नक्कीच मदत करेल तथा कोणताहीआयुर्वेदिक उपाय  सुरू करण्या आधी आपले  सल्लागार व किंवा डॉक्टर यांचा सल्ला जरूर घ्या.

टिप्पण्या